11 डिसेंबरपासून राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन

11 डिसेंबरपासून राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   

 

राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 11 डिसेंबरपासून सुरु होवून 22 डिसेंबरला संपणारेय. या अधिवेशनात 13 विधेयके आणि अकरा अध्यादेश सादर करण्यात येणार आहेत अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी दिली.

कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर विधानभवनात ते बोलत होते. याकाळात 13 नवीन विधेयके आणि 11 अध्यादेश विधीमंडळात मांडले जाणार आहेत. त्या शिवाय विधानपरिषदेतील प्रलंबित 5 विधेयके मांडण्यात येणार आहेत.

या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यात यावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केलीय.  त्यानुसार 20  डिसेंबरला पुनाहा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेतली जाणारेय. या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यावर विचार करुन निर्णय घेतला जाणारेय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version