स्वामिनाथन आयोगाची आठवण आत्ताच का?- कर्जमाफीवरुन मुख्यमंत्र्यांची टीका

स्वामिनाथन आयोगाची आठवण आत्ताच का?- कर्जमाफीवरुन मुख्यमंत्र्यांची टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कर्जमाफीच्या मागणीच्या नावाखाली काही जण अराजक माजवण्याचा प्रयत्न करत आहे अशी गंभीर टीका मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. भाजपच्या कार्यकारिणी बैठकीनंतरच्या मेळाव्यात मुख्यंमत्र्यांचं आक्रमक रुप पाहायला मिळालं.

 

मुख्यमंत्र्यांनी आपल्या आक्रमक भाषणात विरोधकांवर सुकाणू समितीलाही झोडून काढलं. काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना स्वामिनाथन आयोगाची आठवण का नाही आली. आताच कर्जमाफीसाठी आवाज का फुटतोय अशी तोफ मुख्यमंत्र्यांनी डागली.

 

15 ऑगस्टला देशाचा झेंडा फडकवू देणार नाही ही धमकी देतात कशी? या धमकीमागे राजकीय शक्ती आहे. हा तर राष्ट्रद्रोह असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version