भाजपच्या ‘या’ महिला पदाधिकारींची निर्घृण हत्या

भाजपच्या ‘या’ महिला पदाधिकारींची निर्घृण हत्या

नालासोपारा येथे भाजप महिला पदाधिकारी रुपाली चव्हाण यांची निर्घृण हत्या करण्यात आली. तिच्या राहत्या घरात ही हत्त्या करण्यात आली. रुपाली ही वसई भाजप युवती जिल्हा सहप्रमुख म्हणून काम पाहत होती. तसेच व्यवसाय म्हणून ती शू शॉप टाकणार होती. आज त्या दुकानाचं उद्घाटन होतं.

रुपाली घटस्फोटित असून त्या आपल्या मुलगा शिवम आणि एक अनाथ मुलगा नितीन चाफे यांच्यासोबत नालासोपारा येथील यशवंत नगर ‘साईलीला’ अपार्टमेंटमध्ये एकट्याच राहत होत्या. विशेष म्हणजे या घटनेनंतर नितीन फरार आहे. त्यामुळे पोलीस सध्या नितीनवर संशय व्यक्त करत आहेत.

रुपाली दुकानासाठी माल आणण्यासाठी सुरतला जात असल्याचे त्यांनी आपल्या वडिलांना सांगितले होते. पण गेले दोन दिवस त्यांचा पत्ताच नसल्याने त्यांचे वडील रुपाली यांच्या राहत्या घरी गेले. यावेळी घराला कुलूप होते. वडिलांनी ग्रीलवरून चढून खिडकीतून डोकावून पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडले असल्याचे दिसून आले. तेव्हा काहीतरी अघटीत घडले असल्याचा संशय आल्याने पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश करता सर्व प्रकार उघडकीस आला.

नालासोपारा पोलिसांनी रुपालीच्या मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version