पुण्यात नव्या प्रभाग रचनेवर भाजपची नाराजी

पुण्यात नव्या प्रभाग रचनेवर भाजपची नाराजी

पुणे महापालिकेच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर करण्यात आला आहे. या आराखड्यामध्ये पुण्याची विभागणी ५८ प्रभागांमध्ये करण्यात आली आहे. मात्र, पुण्यात नव्या प्रभाग रचनेवर भाजपाने नाराजी व्यक्त केली आहे. पुण्याच्या प्रभाग रचनेमध्ये राज्य सरकारने हस्तक्षेप केल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

पुण्याच्या प्रारूप रचनेच्या आराखड्यात पुण्याची विभागाणी ५८ प्रभागांमध्ये करण्यात आली आहे. तसेच या प्रभागांमधून १७३ नगरसेवक निवडले जाणार आहेत. मात्र, या आराखड्याला भाजपाने विरोध केला असून या आराखड्याविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचे भाजपाने सांगितले आहे.

पुण्याच्या नव्या प्रभागरचनेनुसार राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीचे पुणे शरहाध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या प्रारूप आराखड्याचे स्वागत केले आहे. तसेच आगामी आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी १२२ जागा जिंकून सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा, त्यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version