बिटकॉईनच्या माध्यमातून गुंतवणूक करत असाल तर सावधान

बिटकॉईनच्या माध्यमातून गुंतवणूक करत असाल तर सावधान

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड

 

बिटकॉईन या डिजिटल चलनाचे मायाजाल सगळीकडे पसरलेय. बिटकॉईन च्या फसवणुकीबाबत आता पोलीसांत गुन्हे दाखल होऊ लागल्याने बिटकॉईनची व्याप्ती उघड होऊ लागलीये.

नांदेड शहरातही या अद्रुश्य डिजीटल चलनातील फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. बिटकॉईन कंपनीनं नांदेडमधील अनेकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याचंही समोर आलंय.

याप्रकरणी नांदेडमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेन बिटकॉईनचे एजंट बालाजी पांचाळ, राजु मोतेवार, अमोल थोंबाळे आणि मुख्य आरोपी  बिटकॉईनचा निर्माता अमीत भरद्वाज यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, आरोपी अमोल थोंबाळे यास अटक करण्यात आलीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version