जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
अनधिकृत फेरीवाले,अमराठी पाट्यांच्या विरोधात आंदोलन पुकारल्यानंतर आता मनसेने बाटलीबंद पाणी विक्री करणा-या कंपन्यांच्या बाटल्यांच्या लेबलकडे मोर्चा वळवला आहे.
आंध्रप्रदेश- तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातही पाण्याच्या बाटल्यांवर स्थानिक भाषेत कंपनीचे नाव नमूद करण्याच्या मनसेच्या मागणीला यश आले असून बिस्लेरी कंपनीने मराठीत नाव प्रसिध्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.