‘बिपरजॉय’मुळे समुद्राला उधाण

‘बिपरजॉय’मुळे समुद्राला उधाण

बिपरजॉय वादळ मुंबई किनाऱ्याला धडकणार नसले तरी मुंबईच्या किनारपट्टीवर वेगाने वारे वाहू लागले आहे. यामुळे अलर्ट जारी करण्यात आला असून मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच सौराष्ट्र आणि कच्छच्या किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात खोल दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून याचे रूपांतर ‘बिपरजॉय’ चक्रीवादळात झाले. पुढील काही तासांत हे वादळ हळूहळू तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २४ तासांत मुंबई, ठाणे, पालघर व्यतिरिक्त कोकणातील किनारपट्टी भागात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस पडू शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

मच्छिमारांना मच्छिमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचे आवाहन हवामान खात्यानं केलं आहे. पुढील 48 तासांत हे वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ‘बिपरजॉय’ हे चक्रीवादळ या हंगामात अरबी समुद्रात निर्माण झालेले पहिले चक्रीवादळ आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version