वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पाकिस्तानला खरंच शांतता हवी आहे असं वाटत नाही. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील दहशवादी कारवाया थांबल्यानंतरच पाकिस्तानशी चर्चा केली जाईल.
असं लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी खडसावलंय. दक्षणि कमांडतर्फे राजस्थानमधील थरच्या वाळवंटात लष्कराचा ‘हमेशा विजयी’ हा युद्ध सराव सुरु आहे.
याठिकाणी बिपीन रावत उपस्थित होते. जम्मू-काश्मीरमध्ये ज्या पद्धतीनं दहशतवाद्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यावरून त्यांना शांतता हवी असल्याचं वाटत नसल्याचं बिपीन रावत म्हणालेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.