सोन्याच्या दरात सर्वात मोठी वाढ

सोन्याच्या दरात सर्वात मोठी वाढ

सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसात दिवसेंदिवस वाढ होत असून बुधवारी सोन्याच्या दराने आज पर्यंतचां उच्चांक गाठला आहे. सोन्याचे दर हे दहा ग्राम शुद्ध सोन्याच्या साठी ५८५०० रुपये इतके उच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचला आहे. या संदर्भात सोने व्यावसायिकांच्या मते जागतिक पातळीवर सध्या वाढत असलेली महागाई आणि त्या नंतर आगामी काळात मंदीची लाट येण्याचा अंदाज पाहता,अनेक देशांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदी कडे आपला कल वाढविला असल्याचं सांगितलं जातं आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून जागतिक पातळीवर सोन्याचे मागणीत मोठी वाढ निर्माण झाल्याने त्याचा परिणाम म्हणून सोन्याचे दर वाढले आहे.

गेल्या आठवडा भरात सोन्याच्या दरात प्रतितोळा म्हणजेच दहा ग्रॅम शुद्ध सोन्याच्या किमतीत एक हजार रुपयांची वाढ झाली असून जे दर मागील आठवड्यात ५६००० हजार रुपये प्रतितोळ होते तेच दर बुधवारी ५७००० हजार रुपये तर जी एस टी सहित हेच दर जळगाव चे सुवर्ण नगरीत ५८५०० इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले असल्याचं पाहायला मिळत आहे,अजूनही हे दर वाढू शकतात असा सोने व्यावसायिक यांचा अंदाज आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने त्याचा परिणाम सोन्याच्या ग्राहकिवर झाला आहे. सर्व सामान्य ग्राहकांच्या आवाक्याच्या बाहेर हे दर असल्याने अनेक ग्राहकांनी सोने खरेदी कडे पाठ फिरविली आहे. तर, काहींनी आपलं बजेट बिघडत असल्याने कमी प्रमाणात खरेदी करण्याचा प्रयत्न केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version