Big Boss Marathi: ढोल-ताशांच्या गजरात रितेश भाऊची एंट्री, बिग बॉस मराठी 6 चा टीझर आऊट

बिग बॉस मराठी सीजन 6 चा नवा टीझर प्रदर्शित झाला असून रितेश देशमुख ‘भाऊ’च्या भूमिकेत पुन्हा एकदा होस्ट म्हणून दिसणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
Big Boss Marathi: ढोल-ताशांच्या गजरात रितेश भाऊची एंट्री, बिग बॉस मराठी 6 चा टीझर आऊट

हिंदी बिग बॉस 19 चा पडदा पडताच आता मराठी प्रेक्षकांची नजर एका प्रश्नावर स्थिरावली आहे, बिग बॉस मराठी सीजन 6 कधी सुरू होणार? या बहुचर्चित टेलिव्हिजन शोच्या नव्या पर्वाची चाहूल लागताच कलर्स मराठीने प्रमोशनचा वेग वाढवला असून, प्रत्येक नव्या संकेतासोबत प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढत चालली आहे.

या उत्साहात भर घालणारा एक नवा टीझर नुकताच समोर आला असून, त्यात महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुख ‘भाऊ’च्या भूमिकेत झळकतो आहे. हा टीझर प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर चाहत्यांची गर्दी उसळली. ‘आता या शोची वाट पाहायला लावू नका’, अशा कमेंट्स करत प्रेक्षकांनी आपला उत्साह उघडपणे व्यक्त केला आहे.

हेही वाचा: Lionel Messi: कोलकात्यात मेस्सी दौऱ्यादरम्यान चाहत्यांचा मोठा गोंधळ; खुर्च्या आणि पाण्याच्या बाटल्या फेकल्या

काही सेकंदांचा हा टीझरच प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ठरतोय. टीझरमध्ये रितेश देशमुख बिग बॉसच्या होस्टसाठी सज्ज होताना दिसतो. घरासमोर काढलेली रांगोळी, उंचावलेल्या पताका, आणि सजलेले ढोल-ताशे संपूर्ण वातावरणच एखाद्या सणासारखं भासत आहे. कलर्स मराठीने instagram अकाउंट ला हा टिझर आज पोस्ट केला आहे आणि कॅप्शन मध्ये लिहिले आहे, ‘ आला रे आला! लाडका रितेश भाऊ आला… घेऊन एकदम लय भारी धमाका’. “नवा प्रोमो लवकरच” असा सूचक इशाराही यात शेवटी देण्यात आला आहे.

मागील सीजनने म्हणजेच बिग बॉस मराठी सीजन 5 ने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले होते. विजेता सूरज चव्हाण आणि इतर स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले होते. त्यामुळे नव्या सीजनकडून अपेक्षा स्वाभाविकच जास्त आहेत. हिंदी बिग बॉस 19 संपल्यानंतर रितेश देशमुख बिग बॉसच्या मंचावर दिसल्याने अनेक तर्कवितर्क सुरू झाले होते, आणि सलमान खानने बिग बॉस मराठीबाबत संकेत दिल्यानंतर ही उत्सुकता आणखी वाढली.

यंदाच्या सीजनमध्ये कोणत्या सेलिब्रिटीला घरात प्रवेश मिळणार, कोणाच्या नशिबाची किल्ली फिरणार आणि कोण बाहेरचा रस्ता धरायला लागणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. एकूणच, बिग बॉस मराठी सीजन 6 च्या आगमनाची चाहूल लागताच मनोरंजनप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. हा बहुप्रतिक्षित सीजन लवकरच कलर्स मराठीवर पाहायला मिळणार असून, आता प्रेक्षकांनी हा शो पाहण्यासाठी काउंटडाऊन सुरू केला आहे.

हेही वाचा: Geminid Meteor Shower: या वर्षातला शेवटचा मोठा उल्कावर्षाव ठरणार भाग्याचा; तुटणारा तारा तुमची इच्छा पूर्ण करणार का?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version