बिग बॉसमध्ये हुकशाहने केला स्त्रियांचा अपमान, महेश मांजरेकर म्हणाले ‘मला लाज वाटत आहे’…

बिग बॉसमध्ये हुकशाहने केला स्त्रियांचा अपमान, महेश मांजरेकर म्हणाले ‘मला लाज वाटत आहे’…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बिग बॉस या कार्यक्रमात मंगळवारी बिग बॉस यांनी घरातील सदस्यांना ‘हुकूमशहा’ हा टास्क दिला होता. या टास्कमध्ये ‘नंदकिशोर चौघुले’ हुकूमशहा तर घरातील इतर सदस्य प्रजा आणि आस्ताद रक्षकाच्या भूमिकेत दिसला. या टास्कदरम्यान नंदकिशोरने शर्मिष्ठाला मसाज तर सई डान्स करण्यास सांगितले. शर्मिष्ठाने तिच्या मनाविरुद्ध जाऊन हुकुमशहा झालेल्या नंदकिशोरचे हात पाय दाबले, तर सई माझी व्यक्तिगत नृत्यांगणा असून ती मला हवं तेव्हा नृत्य सादर करेल. असं नंदकिशोरने सर्वांना सांगितले.

नंदकिशोर चौघुलेच्या या वागणुकीवर महिलांचा अपमान केल्याची संतापजनक प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत तर ‘बिग बॉस’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी देखील ‘आज मला लाज वाटतेय’, असं ट्विट करत ट्विटरद्वारे या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version