संदीप देशपांडेच्या हल्ल्यावर मोठा खुलासा

संदीप देशपांडेच्या हल्ल्यावर मोठा खुलासा

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणारे आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. विशेष म्हणजे या सीसीटीव्ही फुटेजमुळे दोन आरोपींचे फोटोही समोर आले आहेत. हल्लाप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईच्या भांडूप भागातून या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय आणखी दोन जणांचा शोध घेतला जात आहे. मुंबई पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी तब्बल आठ पथकं तैनात केली होती. संबंधित सीसीटीव्हीत एक आरोपी हातात स्टंप घेऊन जाताना दिसतोय आणि मध्येच टाकून पळतानाही दिसतोय. हल्ल्यानंतर पळत असतानाचा हा सीसीटीव्ही आहे. आरोपी हे टॅक्सीमधून आले होते आणि टॅक्सीमधून पळून गेले, असं पोलीस चौकशीत समोर आलंय.

संदीप देशपांडेंनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, हल्लेखोरांनी वरुण सरदेसाई, संजय राऊतांना लिहिलेलं पत्र, आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात घेत असलेल्या भूमिकेचा उल्लेख केल्याचं सांगितलंय. तर विधानसभेत भाजपचे आमदार नितेश राणेंनीही देशपांडेंवरील हल्ला प्रकरणात विधानसभेत वरुण सरदेसाईंचं नाव घेतलंय.

संजय राऊतांनी देशपांडेवरील हल्ल्याचा निषेध केलाय. पण हल्ल्यावरुन स्वत: देशपांडेचा रोख संजय राऊत आणि वरुण सरदेसाईंवर आहे. त्यातच अमेय खोपकरांनी या दोघांनाही चिंधी चोर गुंड म्हटलंय. गेल्या काही महिन्यांआधी संदीप देशपांडे ठाकरे गटाच्या नेत्यांवर आक्रमक झालेत. कोरोनाच्या काळापासून, त्यांनी महापालिकेत घोटाळा झाल्याचाही आरोप केलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version