सोलापूर सिद्धेश्वर यात्रेत भाविकांची मोठी गर्दी

सोलापूर सिद्धेश्वर यात्रेत भाविकांची मोठी गर्दी

सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेमध्ये आज अक्षता सोहळा संप्पन झाला आहे. अक्षता सोहळ्यासाठी सर्व मानाचे सात नंदीध्वज सिद्धेश्वर मंदिराजवळ आणण्यात आले होते तसेच संमती कट्टाही फुलांनी सजवण्यात आला होता.

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला ९०० पेक्षा अधिक वर्षाची परंपरा आहे. या यात्रेच्या कालावधीमध्ये जगभरातील सोलापूरकर आवर्जून सिद्धरामेश्वरच्या दर्शनासाठी येत असतात. त्याचबरोबर शेजारच्या जिल्ह्यांमधील अनेक भाविकही इथं गर्दी करतात.

दोन वर्ष कोरोनाच्या सावटामुळे ही यात्रा बंद होती परंतु, आता कोरोनाचे सावट कमी झाल्याने यावर्षी यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत असून यात्रेला भाविकांनी मोठी गर्दी केलीये.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version