ओबीसी आरक्षणाविरोधात मोठं षडयंत्र – देवेंद्र फडणवीस

ओबीसी आरक्षणाविरोधात मोठं षडयंत्र – देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. फडणवीसांच्या नेतृत्त्वात आज ओबीसी मोर्चा बैठक पार पडली. ओबीसी आरक्षणाविरोधात मोठं षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी मोर्चा बैठकीत केला आहे. तसेच आरक्षणाशिवाय निवडणूक दुर्दैवी असल्याचेही फडणवीसांनी सांगितले आहे.

राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होत आहेत. त्यामुळे हे राजकीय आरक्षण गेलेले नाही तर मविआ सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची कत्तल केली असल्याचा आरोप फडणवीसांनी ओबीसी मोर्चा बैठकीत राज्य सरकारवर केला आहे. या बैठीत संजय कुठे, योगेश टिळेकर हेसुद्धा उपस्थित होते.

निवडणुकांसाठी २७ टक्के तिकीट ओबीसींना

ओबीसी आरक्षणासाठी भाजपने अनेक आंदोलने केली आहेत. तसेच यापुढेही भाजप ओबीसींच्या आरक्षणासाठी लढत राहिल. तसेच यापुढे निवडणुकांसाठी ओबीसीला आरक्षण असो किंवा नसो, परंतु भाजप २७ टक्के तिकीट ओबीसी उमेदवारांना देणार अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version