‘कौन बनेगा करोडपती’मुळे बिघडली बिग बींची तब्येत

‘कौन बनेगा करोडपती’मुळे बिघडली बिग बींची तब्येत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमामुळे रिअॅलिटी शोची संकल्पनाच पूर्णपणे बदललीय. या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका आहे ती म्हणजे अभिनेता अमिताभ बच्चन यांची.

बिग बी अमिताभ यांनी या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी घेतल्यामुळे त्याचा प्रचंड फायदा कार्यक्रमाच्या टीआरपीला झालाय. मात्र, कार्यक्रमाची लोकप्रियता वाढवण्याच्या नादात बिग बींच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष झालंय.

आता त्यांना या साऱ्याचा त्रास होऊ लागलाय. व्यस्त वेळापत्रक आणि सततच्या वेळापत्रकामुळे आपल्या स्वरयंत्र याचा त्रास होऊ लागल्याचं त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलंय.

‘केबीसी’च्या चित्रीकरणामध्ये सलग बोलत राहिल्यामुळे त्यांच्या घशामध्ये संसर्ग झाला असून, यामुळे काहीही खाताना त्यांना फार त्रास होत असल्याचे कळतेय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version