जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
अस्वच्छतेमुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या वर्सोवा बीचच्या अस्वच्छतेला सर्वसामान्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत सर्वजण हैराण असतात. बीचच्या सफाईसाठी नेहमी पुढे असनारे अफरोज शाह यांना यावेळी खुद्द बीग बी यांनी मदतीचा हात दिला. बिग बींनी जेसीबी आणि ट्रॅक्टर भेट म्हणून दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानात नेहमी पुढाकार घेणारे अमिताभ बच्चन यांनी वर्सोवा बीचच्या स्वच्छतेसाठी ही छोटी भेट दिली. आपल्या ट्विटर अकांऊंटवर फोटो शेअर करुन बिग बींनी ही माहिती दिली.
‘एखाद्या चांगल्या कामासाठी हातभार लावण्याचा आनंद काही वेगळाच असतो. मी आज केलेलं कामाचा अनुभव हा आयुष्यातील सर्वात समाधानकारक अनुभव होता. वर्सोवा बीचच्या स्वच्छतेसाठी एक्सकॅवेटर आणि ट्रॅक्टर भेट दिला.’ असं ट्वीट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे
अफरोज शाह यांनीही बिग बींनी दिलेल्या जेसीबीआणि ट्रॅक्टरचे फोटो ट्विटर शेअर केले. पर्यावरणविरोधी लढ्यात तुम्ही आशेचा किरण आहात, अशा शब्दात शाहांनी बच्चन यांचे आभार मानले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.