वृत्तसंस्था, गुरूग्राम
आसामी अभिनेत्री आणि गायिका बिदिशा बेझबरुआने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मूळची गुवाहाटीमधील रहिवासी असलेली अभिनेत्री बिदिशानं वर्षभरापूर्वी गुजरातच्या नितीश झासोबत विवाह केला होता.
बिदिशाच्या वैवाहिक जीवनात काही तणाव असल्याचं कुटुंबियांकडून म्हटलं जात आहे. काही दिवसांपासून बिदिशा गुरूग्राममध्ये राहत होती. अभिनय कौशल्यामुळे बिदिशाला आसामी प्रेक्षकांनी नेहमीच गौरवलं होतं. तिच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास घेत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.