सुमारे पावणेदोन वर्षानंतर भुजबळ तुरुंगाबाहेर येणार

सुमारे पावणेदोन वर्षानंतर भुजबळ तुरुंगाबाहेर येणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ अखेर तुरूंगाबाहेर येणार आहेत.

 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी छगन भुजबळ यांना पीएमएलए कोर्टानं मतदान करण्याची परवानगी दिली आहे.

 

राष्ट्रपती निवडणुकीसाठी आपल्याला विधिमंडळात जाऊन मतदान करण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती भुजबळांनी केली होती.

 

भुजबळांच्या विनंती अर्जावर सोमवारी सुनावणी झाली, यावेळी त्यांना परवानगी देण्यात आली. त्यामुळे सुमारे पावणेदोन वर्षानंतर भुजबळ तुरूंगाबाहेर येणार आहेत.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version