जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानामुळे दोन नागरिकांचे प्राण वाचलेत. दादर स्टेशनवर ही घटना घडलीय. सकाळी साडे आठच्या सुमारास एक दामप्त्य पंजाब मेलमधून दादर स्टेशनला उतरले. ही ट्रेन प्लॅटफार्म क्रमांक 5 वर थांबली पण हे दामपत्य प्लॅटफार्मच्या दिशेने उतरण्याऐवजी विरुध्द दिशेने उतरले. आणि रुळ ओलांडून प्लॉट फॉर्म क्रमांक 6 वर येत असताना त्य़ाचवेळी जलद लोकल तेथून जात होती.
हा सगळा प्रकार काळजाचा ठोका चुकवणारा होता. त्याचवेळी तेथे कर्तव्यावर तैनात असलेल्या आरपीएफ जवान दयाराम याने त्यांना पाहिले आणि क्षणाचाही विलंब न करता या दोघांनाही मदतीचा हात देऊन वर उचलून घेतले. काळजाचा ठोका चुकवणारा हा सगळा प्रकार प्लॉटफार्मवर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.