ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. भीमराव गस्ती यांचे निधन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. भीमराव गस्ती यांचे निधन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. भीमराव गस्ती यांचे निधन झाले आहे. बेरड समाजाच्या सुधारणांसाठी गेली 45 वर्षे त्यांनी कार्य केले.

 

कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर न्यूमोनियाचे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मंगळवारी डॉ. गस्ती यांना अस्वस्थ वाटल्याने त्यांना बेळगाव येथील

केएलई सोसायटीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

मात्र, नंतर त्यांना पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय त्यांच्या कुटूंबियांनी घेतला. त्यासाठी ते गुरुवारी सायंकाळी बेळगावहून पुण्याकडे

जाण्यास निघाले.

 

मात्र, कोल्हापूरच्या पुढे वीस किलोमीटर आल्यानंतर त्यांना अधिक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात

दाखल केले. त्यांच्यावर दोन वैद्यकीय अधिकारी उपचार करीत होते, अशी माहिती रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version