भरत जाधव यांना वाढदिवसाच्या “सही रे सही” शुभेच्छा

भरत जाधव यांना वाढदिवसाच्या “सही रे सही” शुभेच्छा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मराठी चित्रपटसृष्टीचा अभिनेता भरत जाधव यांचा आज वाढदिवस आहे. भरत जाधवची विनोदी अभिनेता म्हणून ओळख आहे. त्यांनी अनेक चित्रपटही गाजवले.

चित्रपटात येण्यापूर्वी त्यांनी नाट्यसृष्टीत प्रचंड लोकप्रियता मिळवली. अद्यापही नाट्यसृष्टीशी त्यांची नाळ कायम आहे. मराठीतील लेखक वसंत सबनीस यांच्या सौजन्याची ऐशीतैशी या नाटकातून भरत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

”सही रे सही” “श्रीमंत दामोदर पंत”, “ऑल द बेस्ट”, आणि “आमच्यासारखे आम्हीच” ही त्यांची प्रसिद्ध नाटके आहेत. 12 डिसेंबर 1973 ला भरत जाधवचा जन्म झाला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version