जय महाराष्ट्र न्यूज, नगर
अहमदनगरचं भंडारदरा धरण भरल्यानंतर अंब्रेला धबधबा, स्पिल वे, रंधा फॉल इत्यादी ठिकाणी पर्यटकांची रेलचेल सुरु झाली आहे. त्यातच सलगच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटकांनी भंडारदरा परिसरात पर्यंटकांनी गर्दी केली.
पर्यटकांनी सहकुटुंबासह हजेरी लावत निसर्गाचा आनंद मनमुराद लुटला. भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने धरणाच्या अम्ब्रेला फॉलवरुन फेसाळत नदीकडे झेपावणारे पाणी असे सुंदर मनमोहक निसर्गाचे रुप डोळ्यांचे पारणे फेडतो.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.