महाराष्ट्रातील वीरजवानाला अखेरचा सलाम

महाराष्ट्रातील वीरजवानाला अखेरचा सलाम

जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा

 

जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत  महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील प्रफुल्ल मोहरकर यांना वीरमरण आलंय. 

प्रफुल्ल मोहरकर यांच्या पार्थिवर रात्री  दीड वाजता अंत्यसंस्कार करण्यात आलेत.

  रात्री 11 वाजता प्रफुल्ल यांचे पार्थिव भंडाऱ्यातील पावनी या त्यांच्या मूळगावी आणण्यात आलं. एवढा उशीर झाल्यावरही आपल्या वीर पुत्राला पाहण्यासाठी संपूर्ण शहरवासियांनी हजेरी लावली होती.

यावेळी अमर रहे अमर रहेच्या घोषणाही देण्यात आल्या. यावेळी पावनी वासियांना अश्रू अनावर  झाले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version