भाईजानचे ‘इंशाअल्लाह’ मध्ये कमबॅक

भाईजानचे ‘इंशाअल्लाह’ मध्ये कमबॅक

मुंबई,०८ जुलै २०२३, प्रतिनिधी:  बॉलिवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या धमाकेदार चित्रपटांसाठी कायमच चर्चेत असतो. सलमानच्या चाहत्यांचे त्याच्यावरचे प्रेम कित्येकदा पाहायला मिळते. त्याच्यावर प्रेम करणारे असंख्य चाहते जरी असले तरी, त्याच्या ‘राधे’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’ या दोन चित्रपटांना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान खानची धमाकेदार एन्ट्री प्रक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर; याचबरोबर  त्याच्या आगामी ‘टायगर ३’ या चित्रपटाची देखील सर्वत्र तुफान चर्चा सुरु आहे. या चित्रपटात सलमान खान पुन्हा एकदा कतरिना कैफसोबत अॅक्शन मोडेमध्ये दिसणार आहे. बॉलिवूडच्या पडद्यावर ही हटके जोडी पाहण्यासाठी प्रेक्षकांची आतुरता शिगेला पोहोचली आहे. परंतु, या चित्रपटानंतर सलमान आता नवीन विषयाच्या शोधात आहे.

दोन चित्रपट लागोपाठ आपटल्यानंतर सलमान आता अनोख्या चित्रपट कथानकाच्या शोधात आहे. त्यासाठी तो नवीन कथा देखील शोधत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, बऱ्याच दिवसांपासून बंद पडलेल्या चित्रपटाचे काम पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय सलमान खानने घेतला आहे. त्यासाठी त्याने जुन्या दिग्दर्शक मित्राशी म्हणजेच संजय लीला भन्साली यांच्यासोबत चर्चा केली आहे.

समाज माध्यमांवरील काहीअहवालांनुसार, ‘इंशाअल्लाह’च्या सेटवर सलमान खानचे संजय लीला भन्सालीसोबत भांडण झाले होते. त्यानंतर दोघांनी या चित्रपटात काम करणे बंद केले. परंतु, या सुपरस्टारने चित्रपटासाठी पुन्हा संजय लीला भन्साळीशी संपर्क साधला, चित्रपटाच कथानक आवडल्याने त्याने दिग्दर्शकाशी संपर्क साधल्याची चर्चा आहेत.

या कथेची पार्श्ववभूमी ही अॅक्शन नसून एक सुंदर अशी प्रेमकथा असेल असा दावा समाज माध्यमांद्वारे करण्यात आला आहे . त्यामुळे बॉलिवूडच्या भाईजानला नव्या अवतारात पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुरले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version