भाई जगतापांना पदावरुन हटवलं

भाई जगतापांना पदावरुन हटवलं

मुंबई, ९ जून २०२३, प्रतिनिधी : माजी शालेय शिक्षण मंत्री आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांची मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच भाई जगताप यांना पदावरून हटवण्यात आले आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीचे वारे वाहत असतानाच, मुंबई काँग्रेसमध्ये फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. मुंबई काँग्रेसमध्येही मोठा बदल झाला आहे. भाई जगताप यांना काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदावरून हटवले असून, वर्षा गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी ही निवड केली आहे.

याबरोबरच काँग्रेसने गुजरात आणि पद्दुचेरीमध्ये देखील मोठे बदल केले आहेत. गुजरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी खासदार शक्तिसिंह गोहिल यांची आणि पद्दुचेरीच्या प्रदेशाध्यक्षपदी खासदार व्ही.वैथीलिंगम यांची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हे फेरबदल करत केले असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसने आता आगामी निवडणुकीच्या अनुंषगाने मोठ्या हालचाली सुरू केल्या असल्याचं बोललं जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version