नागपूरमध्ये सुपारी गोदामावर छापे

नागपूरमध्ये सुपारी गोदामावर छापे

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

नागपूरमध्ये गेल्या चार दिवसांपासून सुपारीची विक्री करणाऱ्या गोदामावर छापे टाकण्यात आलेत. बुधवारी चिराग आणि अहिलीवल या दोन कोल्ड स्टोरेजवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने छापे टाकले आहेत.

 

या विभागातील व्यापारी विदेशातून निकृष्ट दर्जाची सुपारी आयात करतात आणि त्यावर प्रक्रिया करुन ती सुपारी विकत असल्याचा तक्रारी प्रशासन विभागाकडे आल्या होत्या. दरम्यान, दुसरीकडे विभागातील अधिकारी आणि काही पोलीस कर्मचारी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर येत आहे.  

 

शनिवारी अन्न व औषध प्रशासन विभागाने अनिल जैन यांच्या वडधामना येथील गोदामावर छापा टाकला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला असून यासंबंधी अधिक तपास वरिष्ठांकडून केला जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version