‘बेस्ट’साठी आर्थिक तरतूद करण्यासाठी 31 जुलैला महत्वपूर्ण बैठक

‘बेस्ट’साठी आर्थिक तरतूद करण्यासाठी 31 जुलैला महत्वपूर्ण बैठक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईकरांसाठी महत्वाची असणारी बेस्ट बससेवा सध्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. आज बेस्टला आर्थिक मदत देण्यासंदर्भात महापालिका स्थायी समिती सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीला महापौर, स्थायी समिती अध्यक्ष तसंच कर्मचारी युनियन पदाधिकाऱ्यांची उपस्थित होते. यासंदर्भात येत्या 31 जुलैला पुन्हा एकदा बैठक होणार असल्याची माहिती देण्यात येत आहे.

 

31 जुलैच्या बैठकीत बेस्टच्या आर्थिक मदतीसाठी निर्णय घेतला पाहिजे. बेस्ट कर्मचारी संपावर जाऊन बससेवा बंद झाली तर त्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त जबाबदार असतील असा इशारा मुंबईच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version