Best Bus Accident : मुंबईत बेस्ट बसचा आणखी एक अपघात; दोन दिवसांतील दुसऱ्या अपघाताने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

गेल्या केवळ 2 दिवसांतील बेस्ट बसचा हा दुसरा मोठा अपघात आहे. यापूर्वी अवघ्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला होता; तर 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले होते.
Best Bus Accident : मुंबईत बेस्ट बसचा आणखी एक अपघात; दोन दिवसांतील दुसऱ्या अपघाताने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Best Bus Accident in Mumbai : मुंबईकरांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या ‘बेस्ट’ (BEST) बसचा आणखी एक भीषण अपघात समोर आला आहे. कांदिवली येथील पोईसर डेपोजवळ ही घटना घडली असून यामध्ये दोन पादचारी गंभीर जखमी झाले आहेत. हा संपूर्ण अपघात परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गोराई डेपोच्या ‘इव्ही ट्रान्स’ (EV Trans) ताफ्यातील ही इलेक्ट्रिक बस असल्याची माहिती समोर आली असून, या अपघातामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षेबाबत नागरिकांमधून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

दोनच दिवसांपूर्वी झाला होता प्राणघातक अपघात
धक्कादायक बाब म्हणजे गेल्या केवळ 2 दिवसांतील बेस्ट बसचा हा दुसरा मोठा अपघात आहे. यापूर्वी अवघ्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका भीषण अपघातात एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाला होता; तर 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच, पुन्हा एकदा दोन दिवसांनंतर कांदिवलीत पादचाऱ्यांना चिरडण्याचा प्रकार बेस्ट बसकडून झाला आहे. लागोपाठ घडणाऱ्या या अपघातांच्या मालिकांमुळे सध्या बेस्ट प्रशासनाच्या कारभारावर आणि ड्रायव्हर्सच्या कुशलतेवर आणि निष्काळजीपणावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

हेही वाचा – PMC Bomb Threat: पुणे महापालिका आणि महापौर कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी; ई-मेलने खळबळ

सीसीटीव्ही फुटेज आले समोर; चौकशीची मागणी
सध्या सोशल मीडियावर आणि वृत्तवाहिन्यांवर या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरून चालणाऱ्या दोन पादचाऱ्यांना बसने थेट धडक दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लागोपाठ होणाऱ्या या अपघातांमुळे मुंबईत बेस्टचे नेमके चालले आहे काय, असा संतप्त सवाल आता प्रवाशांकडून विचारला जात असून, दोषी चालकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version