आहारात करा काळ्या मिरीचा वापर, हे होतील फायदे…

आहारात करा काळ्या मिरीचा वापर, हे होतील फायदे…

मिरची भारतात येण्यापूर्वी जेवणात तिखट चवीसाठी मिरं वापरलं जात असे. काळं मिरं हे केवळ मसाल्याचा पदार्थ म्हणूनच उपयुक्त नसून त्याचे शरीराला इतरही अनेक फायदे आहेत.
काळ्या मिरीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह यांसारखे घटक असतात. हे घटक आपल्या शरीरासाठी पोषक असतात.

  • चेहऱ्यावर असणारे काळे डाग घालवण्यासाठीही काळी मिरी उपयुक्त आहे. काळ्या मिरीची पावडर करून ती गुलाब पाण्यात चांगली मिक्स करून घ्यावी. त्याचा लेप रात्री चेहऱ्यावर लावून सकाळी कोमट पाण्याने धुवावा. असे केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग नष्ट होण्यास मदत होते.
  • आहारात काळ्या मिरीचा वापर केल्यास आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो.
  • दीर्घ काळापासून तुम्ही एखाद्या आजाराशी झगडत असाल, आणि त्यासाठी वेगवेगळे औषधोपचार करून पाहात असाल, तर त्याचबरोबर एकदा काळ्या मिरीचा वापर एकदा नक्की करून पाहा.
  • पचनक्रिया सुधारण्यासाठीही काळ्या मिरीचा वापर केला जातो. लिंबू पाण्यात जर काळं मीठ, ओवा आणि काळी मिरी टाकून सेवन केल्यास त्याने पचनक्रिया सुधारते.
  • सर्दी झाली असेल, तर काळी मिरी कुटून चहामध्ये घालून प्यावं. तसंच काळी मिरी तुपात टाकून खाल्याने सर्दी लवकर बरी होते.
  • घसा बसला असेल, तर गरम पाण्यात थोडी काळी मिरी घालून ते पाणी प्यावे. याने घसा लवकर बरा होतो.
    दातांचा त्रास हा अनेकदा असह्य असतो. जर तुम्हाला दातांची काही समस्या असेल, तर रार्इच्या तेलात थोडी काळी मिरी घालून त्याचं चांगलं मिश्रण करून घ्या. हे मिश्रण आपल्या दातांना लावा. लवकरच त्याचे गुण दिसून येतील.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version