महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात बंदी

महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात बंदी

जय महाराष्ट्र न्यूज,  मुंबई

 

सीमावासियांच्या महामेळाव्यासाठी जाणाऱ्या महाराष्ट्राच्या नेत्यांना बेळगावात बंदी घालण्यात आलीय.

बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींवर बंदी घालण्याचे आदेश दिलेत.

कर्नाटकच्या विधीमंडळ अधिवेशनाविरोधात बेळगावात आज महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय.

या मेळाव्याला महाराष्ट्रातील नेते मंडळी उपस्थित राहणार होते. मात्र, यामुळे जिल्हा प्रशासनाबरोबरच काही कन्नडवासियांमध्ये अस्वस्थता पसरलीय.

त्यामुळे कन्नड पत्रकारांनी मेळाव्याला परवानगी देऊ नये तसंच महाराष्ट्रातल्या नेत्यांना इथे येण्या, मज्जाव करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलीय..

त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी 14 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रातल्या नेते मंडळींवर बंदी घालण्याचे आदेश दिलेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version