जय महाराष्ट्र न्यूज, बेळगाव
बेळगाव सीमाप्रश्नी सोमवारी होणारी नियोजित सुनावणी पुढे ढकलण्यात आली. कर्नाटकचे ज्येष्ठ वकील आजारी असल्याचं कोर्टाला पत्र देण्यात आलं. त्यामुळे ही सोनावणी 9 ऑक्टोबरला होणार आहे.
सोमवारी होणाऱ्या नियोजित सुनावणीसाठी महाराष्ट्रच्या वतीनं बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधीतज्ज्ञ हरिश साळवेंसह अन्य वकील हजर होते. दरम्यान, कोर्टात सोमवारी कागदोपत्र जमा करताना औपचारिक चर्चेवेळी केंद्र सरकारच्या वकिलांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र विरोधी भूमिका घेतली.
सीमा प्रश्नांची याचिका दाखल करण्यास खूप विलंब झाला असून महाराष्ट्राची याचिका रद्दबातल ठरवावी अशी मागणी केंद्र सरकारच्या वकिलां कडून करण्यात येत होती. केंद्राचे वकील रणजित कुमार वारंवार महाराष्ट्र विरोधी भूमिका मांडत होते यामुळे नेहमी केंद्र सरकार कर्नाटकची बाजू उचलून धरत होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.