मुंबई, १९ जून २०२३ , प्रतिनिधी : सिंहगडावरील टिळक बंगल्याजवळ असलेल्या तोफेच्या पॉईंट परिसरात अनेक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. पुण्यात सिंहगडावर जवळपास ५० पर्यटकांवर आज सकाळी मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात अनेक तरुण-तरुणी जखमी झाले आहेत. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सकाळपासूनच सिंहगडावर पर्यटकांनी मोठी गर्दी होती. अशातच मधमाशांनी हल्ला केल्यानं पर्यटकांची मोठी धावपळ उडाली होती.
रविवारची सुट्टी असल्याने सकाळपासूनच सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी आहे. वाहनतळ पूर्ण भरून घाटरस्त्यावर एक किलोमीटर पेक्षा जास्त वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. गाडीतळापासून पुणे दरवाजापर्यंत व गडावरील पायवाटांवर दाटीवाटीने पर्यटक चालताना दिसत. पर्यटक सिंहगड किल्ल्यावर फिरत असताना टिळक बंगल्याजवळ असलेल्या तोफेच्या पॉईंट परिसरात मधमाशांचा थवा आला. यावेळी येथे उपस्थित असलेल्या पर्यटकांवर या मधमाशांनी हल्ला केला. यामुळे पर्यटक गोंधळले. भयभित झाले. सरैवैरा पळू लागले. मधमाशांच्या हल्ल्यात पाच ते सहा जण बेशुद्ध देखील झाले. तर, अनेक जण जखमी झाले. तात्काळ सर्व पर्यटकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
असतानाच टिळक बंगल्याजवळ असलेल्या तोफेच्या पॉईंट परिसरात अनेक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. सकाळपासून सातत्याने या परिसरात मधमाशा घोंगावत असताना पर्यटकांच्या सुरक्षेबाबत वन विभागाने योग्य खबरदारी न घेतल्याने अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी कोणतीही व्यवस्था नाही. सिंहगडावर सुट्टीच्या दिवशी सरासरी पाच ते दहा हजार पर्यटक येतात. मधमाशांचा हल्ला, दरड कोसळणे किंवा इतर दुर्घटना घडतात. त्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत पर्यटकांचा जीव वाचविण्यासाठी कोणतीही व्यवस्था सिंहगडावर नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.