गाडीच्या काचा फोडून 5 लाखांची रोकड लंपास

गाडीच्या काचा फोडून 5 लाखांची रोकड लंपास

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

बीडमध्ये वर्दळीच्या भागात भरदिवसा चोरीची घटना घडलीय. साठे चौकात पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून दोन चोरट्यांनी 5 लाख रुपयांची रोकड लंपास केलीय.या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून चोरटे पैशाची बॅग घेऊन जाताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेत. श्रीराम झंवर यांच्या कारमधून पैसे लंपास करण्यात आले असून ते एका फॅक्टरीचे मालक आहेत.

शेतकऱ्यांना कापूस खरेदीचे पैसे देण्यासाठी त्यांनी एसबीआय बँकेतून सहा लाखांची रक्कम काढली होती. एका शेतकऱ्यास कापसाचे 1 लाख रुपये त्यांनी दिले. उर्वरीत शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी ते जात होते. आंब्याचं सरबत पिण्यासाठी त्यांनी गाडीतून उतरुन गाडी पार्क केली. याचाच फायदा घेत चोरट्यांनी गाडीतील रोकड लंपास केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version