Bus Accident Incident: काळजाचा ठोका चुकवणारी घटना; बीडच्या केजमध्ये धावती बस उलटून आगीचे लोट, 20 ते 25 प्रवासी जखमी

बस उलटल्यानंतर तिला आग लागल्याने मोठी भीती निर्माण झाली. या दुर्घटनेत 20 ते 25 प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Bus Accident Incident: काळजाचा ठोका चुकवणारी घटना; बीडच्या केजमध्ये धावती बस उलटून आगीचे लोट, 20 ते 25 प्रवासी जखमी

बीड: राज्यात रस्ते अपघातांची मालिका काही थांबताना दिसत नाही. विविध ठिकाणी घडणाऱ्या अपघातांमध्ये दररोज अनेक नागरिकांना जीव गमवावा लागत असून, चालकाची चूक किंवा वाहनातील तांत्रिक बिघाड ही अपघातांची प्रमुख कारणे असल्याचे अनेकदा समोर येत आहे. अशातच बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एक गंभीर अपघात घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील मांजरसुंबा रोडवर सांगवी ते पिंपळगाव फाटा परिसरात एका खाजगी बसचा अपघात झाला. आज पहाटेच्या सुमारास ही बस अचानक उलटल्याने बसमधील 20 ते 25 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे बस उलटल्यानंतर काही क्षणांतच तिने आगीचे रौद्ररूप धारण केले, त्यामुळे घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

हेही वाचा: Maharashtra Weather Alert: उष्णतेनंतर हवामानाचा मोठा पलटवार! महाराष्ट्रात पुढील 72 तास वादळी वारे; या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. बसमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढून तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.

जखमी प्रवाशांमध्ये अनेक महिला, पुरुष तसेच लहान मुलांचाही समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बसला आग लागल्यानंतर वाहनाचा अक्षरशः सांगाडा उरला असून, या अपघाताची भीषणता त्यावरून स्पष्ट होत आहे.

अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा: Crime News: ऊसाच्या रसात ‘विष’ कालवून लुटायचे; वृद्ध यात्रेकरूंना बेशुद्ध करून लुबाडणारी गॅंग गजाआड, सोन्याचे दागिने आणि रोकड जप्त

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version