नऊ महिन्यांच्या आरतीला झोपेतच मृत्यूने कवेत घेतले; आईलाही कळाले नाही की ‘ती’ ‘तिला’ कधी सोडून गेली

नऊ महिन्यांच्या आरतीला झोपेतच मृत्यूने कवेत घेतले; आईलाही कळाले नाही की ‘ती’ ‘तिला’ कधी सोडून गेली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

बीडच्या परळी वडसावित्री नगर भागातील नऊ महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अंगणवाडी सेविकेनं एकाच दिवशी दोनदा दिलेल्या लसीमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप चिमुकलीच्या आई-वडिलांनी केलाय.

आरती जाधव असं मृत चिमुकलीचे नाव आहे. अंगणवाडी सेविकेनं गेल्या महिन्याचा आणि चालू महिन्याचा असे दोन डोस एकाच दिवशी दिल्यानं आरतीला खूप त्रास होऊ लागला.

त्यानंतर चिमुकली आरती शांतपणे झोपून होती. मात्र, खूप वेळ होऊनही चिमुकली उठत नसल्यानं तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं.

मात्र याआधीच चिमुकलीचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. दरम्यान चिमुकली आरतीचा मृत्यू अंगणवाडी सेविकेनं एकाच दिवशी दोन लसी दिल्यानं झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version