जय महाराष्ट्र न्यूज, बीड
बीड तालुक्यातील शिरापूरमध्ये गावगुंडाच्या त्रासानं उच्चांक गाठलेला दिसतोय. गावात गावगुंडांची 15 ते 20 जणांची टोळी निर्माण झालीय.
जी टोळी गावातील महिला आणि मुलींची दिवासा ढवळ्या छेड काढते. त्यामुळे संपूर्ण गाव सध्या गावगुंडांची दहशतीखाली आपलं जीवन जगताहेत. गावातील महिला या गावगुंडामुळे भयभीत झाल्या आहेत.
या विरोधात गावातील सर्व महिलांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन पोलिसांना दिलेय…
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.