विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंना बीडमधील दुर्घनास्थळी जाण्यास रोखण्याचा प्रयत्न

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंना बीडमधील दुर्घनास्थळी जाण्यास रोखण्याचा प्रयत्न

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

 

बीडमधील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील दुर्घटनेतील मृतांचा आकडा पाचवर पोहोचलाय. तर, तीन जणांची प्रकृती अत्यावस्थ आहे.

दरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंना वैद्यनाथ कारखान्यावर दुर्घटनास्थळी जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

मात्र, धनंजय मुंडे यांनी मृत पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांचे सांत्वन केलंय. शुक्रवारी साखर कारखान्यात गरम उसाची टाकी फुटल्यानं 15 कामगार जखमी झाले होते.

दरम्यान कामगारांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख तर मुंडे कुटुंबातर्फे एक लाखाची मदत जाहीर करण्यात आलीय.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version