सौंदर्यवर्धक तांदळाचे पीठ

सौंदर्यवर्धक तांदळाचे पीठ

मुंबई,२७ एप्रिल २०२३,प्रतिनिधी:वाढत्या वयानुसार त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. तुमच्या त्वचेच्या संरचनेनुसार तुम्ही योग्य काळजी घेतल्यास डोळ्यांखालील काळे डाग आणि काळी वर्तुळे टाळता येतात. आज यासाठीच आम्ही तुम्हाला स्वस्त आणि मस्त उपाय सांगणार आहोत.

१.चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग घालवण्यासाठी
जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग असतील तर तांदळाचे पीठ आणि ब्लॅक टी मिक्स करून फेस पॅक बनवा. सर्व प्रथम एका भांड्यात एक कप उकळलेले पाणी भरा आणि त्यात एक ब्लॅक टी बॅग 2-3 मिनिटे भिजत ठेवा. आता त्यात प्रत्येकी एक चमचा तांदळाचे पीठ आणि मध घाला. ही पेस्ट तयार झाल्यावर चेहऱ्यावर मसाज करा. त्यानंतर 15 मिनिटांनी चेहरा धुवा.

२.चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी
चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी एका भांड्यात 2 चमचे तांदळाचे पीठ घ्या आणि त्यात 2 चमचे एलोवेरा जेल आणि 2 चमचे किसलेली काकडी घाला. आता ते चांगले मिसळा आणि चेहऱ्यावर आणि मानेला लावा. दोन ते तीन वापरानंतरच चेहऱ्यावर फरक दिसून येईल.

३.चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघण्यासाठी
तांदळाचे पीठ आणि ओट्समध्ये कच्चे मध मिसळून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेतून मृत पेशी, अतिरिक्त तेल निघून जाईल

 

 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version