मुंबई, २ जुलै २०२३, प्रतिनिधी : एलन मस्क यांच्या हातात सूत्र आल्यानंतर ट्विटरमध्येबरेच बदल करण्यात आले आहेत. ट्विटरच्या ब्लू टिकसाठी ६९९ रुपये भरावे लागणार आहेत. एवढं नाही तर आता ट्विटरमध्येही अनेक बदल केले जात आहेत. एलोन मस्कने अनेकदा आपल्या निर्णयांनी लोकांना आश्चर्यचकित केले आहे.अलीकडेच इलॉन मस्क यांनी ट्विट करून काही नवीन निर्बंध जाहीर केले आहेत. त्यांनी ट्विट केले की, आता नॉन व्हेरिफाईड अकाउंट्स एका दिवसात फक्त ६०० ट्विट वाचू शकतील. जरी या मर्यादा तात्पुरत्या स्वरूपात लागू केल्या गेल्या आहेत.
डेटा स्क्रॅपिंग आणि सिस्टम मॅनिप्युलेशनच्या पातळीचे निराकरण करण्यासाठी आम्ही तात्पुरत्या मर्यादा लागू केल्या आहेत, असं एलॉन मस्क यांनी म्हटलं आहे. त्यावेळी वेरिफाईड अकाऊंटला दिवसाला ६००० पोस्ट वाचता येतील, तर अनवेरिफाईड अकाऊंटला ६०० पोस्ट दिवसाला वाचता येतील. त्याचबरोबर नवीन अनवेरिफाईड अकाऊंटला दिवसाला फक्त ३०० पोस्ट वाचता येणार आहे, अशी माहिती ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी दिली आहे.
To address extreme levels of data scraping & system manipulation, we’ve applied the following temporary limits: – Verified accounts are limited to reading 6000 posts/day
– Unverified accounts to 600 posts/day
– New unverified accounts to 300/day — Elon Musk (@elonmusk) July 1, 2023
एलॉन मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी गेल्यापासून या मायक्रोब्लॉगिंग वेबसाईटमध्ये अनेक बदल झाले आहेत. अशातच आता नवा बदल करण्यात आल्याने अनेकांच्या मोबाईलवर पोस्ट दिसत नसल्याचं दिसतंय. अनेक मोठ्या कंपन्यांना देखील हा नियम लागू असल्याने आता सर्वांचीच चिंता वाढल्याचं दिसतंय.दरम्यान, सकाळपासून दर मर्यादा ओलांडल्याचं सांगत युजर्सना पोस्ट करण्यापासून रोखलं जात आहे. भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील सर्वत्र रेट लिमिट लागू केलं गेलंय. त्यामुळे ट्विट करण्यात तसेच इतरांचे ट्विटर अकाऊंटला फॉलो करण्यात अडचणी येत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.