गणेश नाईकांना दणका; नवी मुंबईतील बावखळेश्वर मंदिर जमीनदोस्त करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

गणेश नाईकांना दणका; नवी मुंबईतील बावखळेश्वर मंदिर जमीनदोस्त करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

 

मुंबई उच्च न्यायालयाने बेलापूर येथील बावखळेश्वर मंदिर आणि ट्रस्टचं ऑफिस महिन्याभरात जमीनदोस्त करण्याचे निर्देश दिलेत. बेकायदा बांधकामं तोडण्यात आली असली तरी, एमआयडीसीच्या सुमारे अकराशे चौरस मीटर भूखंडावरील बावखळेश्वर मंदिर आणि मंदिर ट्रस्टच्या ऑफिसवरील कारवाई गेल्या अनेक वर्षांपासून रखडली होती.

अखेर मुंबई उच्च न्यायालयाने याविषयी नुकताच आदेश देऊन हे मंदिर जमीनदोस्त करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकार आणि एमआयडीसीने गरज पडल्यास पोलिस बळाची मदत घेऊन चार आठवड्यांच्या आत पाडण्यास सांगितलं आहे.

तसंच येथील सर्व बेकायदा बांधकामे ही एमआयडीसीच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताविना शक्य नाही, असं मत व्यक्त करत, एमआयडीसीने जबाबदारी निश्चित करुन संबंधित अधिकाऱ्यांवरही कायद्यानुसार कारवाई करावी, असे निर्देशही खंडपीठाने निकालात दिलेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version