नागपुरात विविध योजनांसाठी 595 कोटी- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

नागपुरात विविध योजनांसाठी 595 कोटी- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

नागपूर जिल्ह्यातील 51 विभागांसाठी विविध योजनांसाठी 595 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यांचे पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितलं.

 

सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती योजना, आदिवासी उपायोजना, ओटी, एसपी योजनांसाठी 2017-18 या वर्षासाठी 595 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तर शासकीय वैदयकिय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी शासकीय वैदयकिय महाविद्यालय आणि डागा रुग्णालय यांच्यासाठी अतिरिक्त 50 कोटींची मागणी राज्यशासनाकडे पाठवण्यात आली असल्याचं पालकमंत्री बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version