Laxman Hake: ‘मला ताईंसह अनेक वरिष्ठ नेत्यांचे फोन आले म्हणून मी…’; बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेताना लक्ष्मण हाकेंनी मांडली ओबीसींची व्यथा

बारामती पोटनिवडणुकीत लक्ष्मण हाके यांनी माघार घेतल्याने राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.
Laxman Hake: ‘मला ताईंसह अनेक वरिष्ठ नेत्यांचे फोन आले म्हणून मी…’; बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेताना लक्ष्मण हाकेंनी मांडली ओबीसींची व्यथा

बारामती: बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुका सध्या राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आल्या आहेत. दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये तर दिवंगत शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीमध्ये पोटनिवडणूक होत आहे.

बारामतीत काँग्रेसकडून अशोक मोरे यांना उमेदवारी देण्यात आली असून ते सुनेत्रा पवार यांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. दरम्यान, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सुरुवातीला उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, त्यांनी आता निवडणुकीतून माघार घेतली आहे.

हेही वाचा: Baramti Byelection 2026: बारामती पोटनिवडणूक : ओबीसींची माघार, काँग्रेस मात्र आग्रही; सुनेत्रा पवारांचा बिनविरोधचा मार्ग अजूनही अवघड

“वरिष्ठांचा फोन आला म्हणून माघार”

जय महाराष्ट्रशी संवाद साधताना लक्ष्मण हाके म्हणाले, “मी निवडणूक लढवणार होतो. मात्र वरिष्ठांचा फोन आला, ‘सुनेत्रा ताईंचाही फोन आला’, त्यामुळे मी माघार घेतली.” ते पुढे म्हणाले की, “ओबीसींचे अनेक प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. 10 टक्के प्रश्न सुटतात, पण 90 टक्के प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे मी आंदोलनाच्या माध्यमातून हे प्रश्न मांडत राहणार आहे.”

आंदोलन सुरूच ठेवणार

हाके यांनी स्पष्ट केले की, “निवडणुकीतून माघार घेतली असली तरी ओबीसींच्या हक्कांसाठी माझा लढा सुरूच राहील. लोकशाही मार्गाने आंदोलन करत राहणार आहे.” तसेच त्यांनी सांगितले की, या पोटनिवडणुकीसाठी त्यांना विविध पक्षांकडून ऑफर्स आल्या होत्या, मात्र त्यांनी त्या नाकारल्या.

पुढील राजकीय समीकरणांवर लक्ष

दरम्यान, हाके यांच्या माघारीनंतर आता काँग्रेसचे अशोक मोरेही निवडणुकीत राहतात की माघार घेतात, याकडे लक्ष लागले आहे. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचीही चर्चा आहे.

एकूणच, बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून पुढील काही दिवसांत या निवडणुकांचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. 

हेही वाचा: Rohit Pawar Tweet : बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुतण्याची काकीला साथ! केलं भावनिक आवाहन, म्हणाले, निवडणूक बिनविरोध करण्याची आमची विनंती…’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version