ब्ल्यू व्हेल गेमचं वेड; सोलापुरचा मुलगा सापडला पुण्यात

ब्ल्यू व्हेल गेमचं वेड; सोलापुरचा मुलगा सापडला पुण्यात

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

ब्लू व्हेलनं दोघांचा बळी घेतला आहे. तर दोघांना या गेमपासून वाचवण्यात यश आले.

 

महाराष्ट्राच्या सोलापुरातही  14 वर्षाच्या मुलानं जीव गमावला असता. पण पोलिसांनी वेळीच पावलं उचलल्यानं या मुलाचा जीव वाचला.

 

सोलापूरचा एक मुलगा ब्ल्यू व्हेल गेमचं टास्क पूर्ण करण्याच्या नादात पुण्याच्या दिशेनं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

 

भिगवण पोलीस स्टेशनच्या एन एम राठोड यांना तातडीनं भिगवण एस टी स्टँड गाठलं. पुण्याला जाणाऱी बस सुटण्याच्या आत त्यांनी मुलाला ताब्यात घेतले. 

 

तर, मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये एक मुलगा शाळेच्या इमारतीवर आत्महत्या करण्यासाठी गेला. त्याचे मित्र आणि शिक्षकांनी त्याला वेळीच रोखले. त्यामुळे त्याचा जीव

वाचला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version