Baramati Crime News : धक्कादायक! मानेवर जखमा, अंगावर कपडे नाहीत; विचित्र अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह, तपास सुरू

काळखैरेवाडी येथील माळरानावर सदर महिलेचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 
Baramati Crime News : धक्कादायक! मानेवर जखमा, अंगावर कपडे नाहीत; विचित्र अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह, तपास सुरू

सध्या सर्वत्र जिल्हापरिषद निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. अशातच आता बारामती तालुक्यातील काळखैरेवाडी परिसरात खळबळजनक घटना उघडकीस आली असून, अज्ञात महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काळखैरेवाडी येथील माळरानावर सदर महिलेचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  बारामती तालुक्यातील सुपे पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. काळखैरेवाडी गावाच्या हद्दीत खैरेपडळ इथं सुपा शेरेवाडीच्या रोडलगत परिसरात एका २५ ते २७ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. एका महिलेचा अर्ध नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्यामुळे बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली.

 या संदर्भात प्राथमिक दृष्या पाहिलं असलं गळा दाबून महिलेला जीवे ठार मारलं आहे, असं अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या महिलेवर अत्याचार करून खून केला असावा, असा अंदाजही पोलिसांनी वर्तवला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version