बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक संकेतस्थळाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक संकेतस्थळाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे महाराष्ट्रातलेच नव्हे तर देशाच्या राजकारणातील धगधगते अग्निकुंड. या शिवतेजाने तब्बल पाच दशके मराठी माणसाच्या मनात अस्मितेची मशाल चेतवत ठेवली. 17 नोव्हेंबर 2012ला हे अग्निकुंड शांत झाले, परंतु आजही त्यांचे विचार मराठी माणसाला स्फूर्ती देतायेत. त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक स्मृतिस्थळावर दाखल झालेयेत.

शिवतीर्थाजवळ शिवसेनाप्रमुखांचे राष्ट्रीय स्मारक उभारले जाणार आहे. त्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने या स्मारकाचे संकेतस्थळ बनवलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महापौर निवास येथे या संकेतस्थळाचे लोकार्पण स्मारक समितीच्या वतीने दुपारी 12 वाजता करण्यात येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version