जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
शरद पवार आम्हाला बाळसाहेबांच्या जागी आहेत, अशा शब्दांत मनसे नेते बाळा नांदगावकर पवारांचे कौतुक केले आहे.
पुण्यातल्या म्हाळुंगे-बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममधे खासदार अशोक मोहोळ यांच्या अमृत महोत्सव पार पडला. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला शरद पवारांसह विविध पक्षातले मान्यवर उपस्थित होते. यावेळी बाळा नांदगावकर यांनी मनसेतून बाहेर पडलेले नगरसेवक, फेरीवाल्यांचा मुद्द्या यावरुन राजकीय फटकेबाजीही केली.
पवार साहेबांना आम्ही बाळासाहेबांच्या जागी मानतो. त्यामुळे त्यांच्याविषयी एक वेगळा आदर आमच्या मनात आहे.
पंतप्रधान मोदींच्या शरद पवारांवरील वक्तव्यावरुन बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की, “मध्यंतरी आम्ही ऐकलं होतं की, पवार साहेबांचं बोट धरुन अनेक माणसं मोठी झाली. कुठे कुठे पोहोचली. पण पवार साहेब मराठी माणसाच्या मनात एक मोठी खंत आहे. तुम्हाला पद्मभूषण मिळालं, याचा निश्चित आनंद आहे. एक ‘पी’ तर मिळाला, पण दुसरा ‘पी’ कधी मिळणार असे म्हणत बाळा नांदगावकरांनी पवारांच्या पंतप्रधान पदाबाबत भाष्य केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.