शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंनी केली खूप मोठी घोषणा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंनी केली खूप मोठी घोषणा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना सर्व राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केलीय.

आगामी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढेलच, पण यापुढे सर्वच राज्यात शिवसेना उमेदवार देईल अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.

आम्ही निवडणूक जिंकू किंवा हरु, किती मतं पडतील माहित नाही, पण आम्ही लढू असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

तसंच अहमदाबादमध्ये पतंग उडवण्यापेक्षा, लाल चौकात नेऊन तिरंगा फडकवला असता तर पंतप्रधान मोदींचा अभिमान वाटला असता असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींसह भाजपवर हल्लाबोल केलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version