बाळासाहेबांचं स्मारक महापौर बंगल्याखाली!

बाळासाहेबांचं स्मारक महापौर बंगल्याखाली!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक आता महापौर बंगल्याऐवजी बंगल्याखाली भूमिगत स्वरूपात बांधलं जाणार आहे. तसेच हे स्मारक 9 हजार चौरस फुटांच्या जागेत होणार आहे.

त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ऐतिहासिक वास्तू असलेल्या या बंगल्याची कुठलीही तोडफोड अथवा येथील झाडांचीही कत्तल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

या महापौर बंगल्याला ऐतिहासिक वारसा असून पुरातत्व विभागाकडून ‘ब’ दर्जा मिळालेला आहे.

त्यामुळेच या वास्तूचं जतन करुन त्याचं पर्यटनात रुपांतर होईल. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीच पुढाकार घेतला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version