देशात ‘बकरी ईद’चा उत्साह

देशात ‘बकरी ईद’चा उत्साह

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

देशात आज ईद उल अधा म्हणजेच बकरी ईद उत्साहात साजरी होत आहे. दिल्लीच्या जामा मशिदीमध्ये नमाज अदा करण्यात आली, तर कुर्ला पूर्व भागात स्टेशनजवळ सामूहिक नमाज अदा करण्यात आली. नमाज नंतर एकमेकांना ईद मुबारकच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत.

 

कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. कुर्ला पूर्व येथे सकाळी सव्वा सात वाजता सामूहिक नमाज अदा करण्यात आली. कुर्ला पूर्व स्टेशनजवळ रस्त्यावर ही नमाज अदा करण्यात आली. बेस्टने आपल्या बसेस तात्पुरत्या बंद केल्या होत्या.

 

बकरी ईद निमित्त सांगलीतील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आले. या नमाज पठणात हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. सकाळी साडे आठ वाजता ईदची नमाज अदा करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधवांनी अमन आणि शांतीचा संदेश देत ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version