वृत्तसंस्था, उत्तराखंड
उत्तराखंडमधील बद्रीनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात चीफ इंजिनीअर ठार झाला. हेलिकॉप्टर बद्रीनाथहून भाविकांना घेऊन हरिद्वारच्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात दोन पायलट जखमी झाले आहेत. तर भाविक सुखरुप असल्याचे सांगण्यात येत आहे.
दुर्घटनेनंतर तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर मुंबईतील क्रिस्टल कंपनीचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.